
प्रभाग क्र. ६ : कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार विवेक मुत्यलवार यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद
प्रभाग क्र. ६ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून नगरसेवक पदासाठी उमेदवारी देण्यात आलेले विवेक मुत्यलवार यांचा प्रचार जोरदार गती घेत आहे. मागील अनेक वर्षांपासून साई सेवा संस्थेच्या माध्यमातून ते सातत्याने सामाजिक कार्यात सक्रिय असून, मित्रपरिवारासह तसेच सपत्नीक शिर्डी येथे सेवा देण्याचे त्यांचे कार्य विशेष उल्लेखनीय आहे.
शहरातील प्रत्येक सामाजिक उपक्रमात त्यांचे नियमित योगदान राहिले आहे. त्यामुळे शहरभर त्यांचा विस्तृत मित्रपरिवार निर्माण झाला असून त्यांच्याबद्दल आदर आणि आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.
विवेक मुत्यलवार हे विविध कार्यकारी सहकारी संस्थांवर संचालक म्हणून निवडून येऊन, शेतकरी विकास व मदतकार्य क्षेत्रातही मोलाची भूमिका बजावत आहेत. यावेळी ते काँग्रेसच्या तिकीटावर पुन्हा एकदा प्रभाग ६ मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या सोबत कार्यरत असलेल्या नलिनी आडपवार यांचाही या प्रभागात प्रभाव असून, दोघांची जोडी मतदारांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
विनम्र स्वभाव, कार्यतत्परता आणि लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या प्रतिमेमुळे मुत्यलवार यांचा विजय निश्चित मानला जात असल्याची चर्चा मतदारांतून ऐकायला मिळत आहे. मागील निवडणुकीत अत्यंत कमी मतांनी झालेला त्यांचा पराभव अनेक मतदारांना खंत देणारा ठरला होता. यंदा मात्र त्याच पराभवाची सहानुभूती लाट मुत्यलवार यांच्या बाजूने दिसत असून, प्रचारात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रभाग ६ मध्ये उत्साहपूर्ण व रंगतदार निवडणूक वातावरण तयार झाले असून, काँग्रेस उमेदवार विवेक मुत्यलवार यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने मतदार पाहत असल्याचे चित्र आहे.












