
प्रभाग क्रमांक ५ मधील उमेदवारीचे राजकीय समीकरण बदलण्याची क्षमता असलेले तरुण आणि दमदार व्यक्तिमत्त्व म्हणजे ऋतीक दिनेश गोयल. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने त्यांच्यावर विश्वास दाखवत अधिकृत उमेदवारी जाहीर केली असून, संपूर्ण प्रभागात ते ‘पंजा’ चिन्हाचा जोरदार, उत्साही आणि लक्ष्यवेधी प्रचार करत आहेत. मतदारांमध्ये त्यांच्या प्रचाराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.
मूल शहरातील गोयल परिवार हे मागील सहा दशकांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि धर्मादाय क्षेत्रातील प्रतिष्ठित व सक्रीय नाव आहे. अनेक राजकीय पक्षांशी मैत्रीपूर्ण संबंध असूनही हा परिवार आजवर थेट राजकीय रणांगणात उतरला नव्हता. मात्र नव्या पिढीतील ऋतीक गोयल यांनी धाडसी पाऊल उचलत निवडणूक रिंगणात प्रवेश केला आहे.
ऋतीकचे वडील दिनेश गोयल यांच्या निरंतर सामाजिक बांधिलकी, लोकसहभागातून उभ्या राहिलेल्या विश्वासार्ह प्रतिमा आणि भक्कम जनसंपर्कामुळे ऋतीक यांच्या प्रचाराला नैसर्गिक गती लाभली आहे. या मजबूत पायाभरणीमुळे ऋतीक गोयल हे प्रभाग ५ मधील विजयाचे प्रमुख दावेदार म्हणून उदयास येत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.












