विधानभवन तसेच मंत्रालयात आपले कर्तव्य बजावणारे दक्ष पत्रकार बांधवानसाठी आल्यावधित प्रसिद्धीच्या शिखरावर आसलेल्या महाराष्ट्र जनसत्ता न्युज चॅनेल कडून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२४ या कालावधीतील विधानभवनात वृत्त संकलन करून आपआपल्या चॅनेल चे काम करणाऱ्या पत्रकार प्रतिनिधी साठी स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला यामध्ये त्यांच्या नावांची यादी करून ड्रा पद्धतीने तीन जणांना पाणी बॉटल, लेखणी, डायरी देण्याचा उपक्रम मुख्य संपादक रूपसेन उमराणी यांनी घेतला .
टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन मुंबई अध्यक्ष वि विनोदजी जगदाळे यांच्या हस्ते (१) प्रेम म्हात्रे टीव्ही ९ (२) रौनक वाल्मीकी आर एन ओ (३) महेश हलवाई ए एन आय न्युज जर्नलिस्ट यांना वरील भेट वस्तू प्रदान करण्यात आल्या.
या प्रसंगी टीव्ही जर्नलिस्ट असो.अध्यक्ष विनोदजी जगदाळे, नवनिर्वाचित महाराष्ट्र जनसत्ता संपादक महाराष्ट्र राज्य शौकत मुजावर तथा दै.झुंजार केसरी निवासी संपादक पुणे, मुख्य संपादक रूपसेन उमरानी सह टीव्ही जर्नलिस्ट उपस्थित होते.