ती महिला आहे, पुरूषांच्या हक्काच्या क्षेत्रात वाघीणी बनून लढतेय, हेच पुरूषप्रधान संस्कृतीला मान्य नाही आणि यातूनच तीचे विरोधात फेक नॅरेटिव्ह पसरविणे सुरू केले, तीला नाऊमेद करण्यांचे प्रयत्न चालू झाले, मात्र ती आपल्याच गोतावळ्यातील ‘सहकार्यां’च्या असहकाराला बळी न पडता, हाती घेतलेले मिशन पूर्ण करण्यांचे दिशेने दमदार वाटचाल सुरू केले. कॉंग्रेस नेत्या, प्रियंका गांधी यांच्या ‘लडकी हू, लढ सकती हू!’चा आदर्श घेवून त्यांही चंद्रपूर—वणी—आर्णी लोकसभा क्षेत्रातील जनतेला न्याय देण्यांसाठी, आपल्या अकाली स्वर्गवासी पतीचे स्वप्नपूर्तीसाठी घेतलेला वसा खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर या पूर्ण करीत आहे.
मोदी लाटेत प्रतिकुल परिस्थितीत चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून 2019 मध्ये बाळूभाऊ धानोरकर खासदार म्हणून निवडूण आलेत. अख्या राज्यात कॉंग्रेसचे ते एकमेव खासदार होते. आपल्या हयातीत त्यांनी या क्षेत्रातील जनतेला विशेषत: बेरोजगार युवक, शेतकरी व महिलांना न्याय देण्यांचा प्रयत्न केला. पक्षातंर्गत् जिल्हयात त्यांचे वर्चस्व निर्माण होत असल्यांने दु:खी झालेले कॉंग्रेसमधीलच दुखी आत्मे बाळूभाऊना राजकीय त्रास देणे, त्यांची बदनामी करणे सुरू केले. मात्र हा ढाण्या वाघाचा बंदोबस्त करता येत नाही हे लक्षात येताच, त्यांच्या जीवावर उठण्याचा प्रयत्नही पक्षातूनच झाला. खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांनी यावर यापूर्वीच भाष्य केलेले आहे.
बाळूभाऊच्या पश्चात त्यांनी आमदार पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी या लोकसभेवर दावा केला. हा दावा तसा नैसर्गीक होता. अलिकडे सर्वच पक्षात पदावरील व्यक्ती मृत पावले तर, त्यांचे जागेवर त्यांचे कुटूंबियातील व्यक्तीनाच संधी दिली जाते. याला कुणी विरोध करतांनाही दिसत नाही. मात्र चंद्रपूर लोकसभा मतदार संघात बाळूभाऊच्या जीवंतपणीच त्यांनी आपली राजकीय वारसदार म्हणून आपली पत्नी प्रतिभा धानोरकर यांना पुढे केले. जनतेनी प्रतिभाताईंना आमदार म्हणून निवडूण देत बाळूभाऊचा निर्णय मान्य केले. बाळूभाऊ नंतर, प्रतिभा धानोरकर यांना कॉंग्रेसने खासदारकीची तिकीट विनासायस द्यायला हवी होती, मात्र गरज नसतांना, मतदार संघाचे बाहेरील कॉंग्रेसचेच विजय वडेट्टीवार यांनी आपली अनुभव नसलेल्या कन्या शिवाणी वडेट्टीवार यांना लोकसभेसाठी तयार करून, पक्षाअंतर्गत स्वत:च वाद निर्माण केला. पक्षानी श्रीमती धानोरकर यांना उमेदवारी दिल्यानंतर मात्र खासदार बनू पाहणार्या शिवाणी वडेट्टीवार किंवा विजय वडेट्टीवार यांनी धानोरकर यांचे प्रचारापासून चारहात दुरच राहीले. सहा सहा महिण्यापूर्वी स्वर्गवासी झालेल्या बाळूभाऊच्या कार्याचा मागोवा घेत, श्रीमती प्रतिभा धानोरकर एकटी लढली, सिंहासारखी लढली आणि जिंकलीही!
ज्या समाजांनी बाळू धानोरकर यांचेवर व त्यांचे पश्चात प्रतिभा धानोरकर यांचेवर प्रेम केले. त्याच समाजानी ब्रम्हपुरीत खासदार श्रीमती धानोरकर यांचा सत्कार केला. या सत्काराला उत्तर देतांना, श्रीमती धानोरकर यांनी आपल्या समाजाच्या माणसाच्या मागे ठामपणे उभे रहा असा सल्ला समाजबांधवाना दिला. ज्या समाजानी श्रीमती धानोरकर यांना ताकद दिली, त्या समाजाला पुढे नेणे हे खासदार धानोरकर यांचे कर्तव्य आहे, ते आपले कर्तव्य पूर्ण करीत असतांना मात्र, त्यांच्या या समाजप्रेमाला, त्यांचे राजकीय विरोधकांनी मात्र ‘वडेट्टिवार विरूध्द धानोरकर’ असा वाद मुद्दाम दिला.
मतदार संघाचा विकास करावयाचा असेल तर खासदार सोबतच आमदार आणि स्थानिक स्वराज्य संस्थेत आपल्या विचाराचे, आपल्यावर विश्वास ठेवणारे असेल तर विकासाची गती अधिक वाढते हे सर्वमान्य तत्व आहे. याच तत्वातून, धानोरकर कुटूंबियातील वरोराची आमदारकी आपल्याच विचारांचे व्यक्तीकडे जावी यासाठी एक खासदार म्हणून प्रयत्न करणे ही काही चूक नाही, सहा विधानसभा क्षेत्राची प्रतिनिधीत्व करीत असतांना, लोकसभेत या सहाही मतदार संघात कॉंग्रेसला आघाडी मिळवून देणार्या खासदार धानोरकर यांनी एका जागेसाठी पक्षाकडे मागणी करणे यात गैर काय? कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा या सर्व पक्षात एका घरात तीन—तीन, चार—चार व्यक्तीकडे संविधानीक पदे आहेत, मात्र घराणेशाहीचा टार्गेट खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांनाच करण्यात आले. त्यांचे विरोधात तसे नॅरेटिव्ह पसरविण्यात आले. पक्षातील आणि घटक पक्षातील नेते बंडखोरी करीत असतांनाही, त्यांना शांत करण्यांचे प्रयत्न करण्याऐवजी या परिस्थितीला खासदार श्रीमती धानोरकर याच कशा जबाबदार आहेत, हेच सांगण्याचा प्रयत्न या मंडळीकडून करण्यात आला. खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर या महिला आहेत, प्रविण काकडे निवडूण आले असते तर पुरूषप्रधान संस्कृतीच्या राजकीय क्षेत्रात एका महिलेची ताकद वाढली असती. जिल्हयातील पुरूष राजकीय मंडळीना याचीच भिती असल्यांने, त्यांनी सर्व बाजूनी प्रविण काकडेना घेरून, अप्रत्यक्ष खासदार धानोरकर यांचेवरच प्रहार केला.
खासदार प्रतिभा धानोरकर यांचेमुळेच जिल्हयात कॉंग्रेसचे उमेदवार पडले असा भ्रामक प्रचार आता धानोरकर विरोधकांकडून चालविला जात आहे. मात्र राज्यातच महाविकास आघाडीची वाताहत झाली, मग याला जबाबदार कोण? याचे उत्तर मात्र कुणाकडेही नाही.
एक मात्र चांगले झाले, विधानसभेच्या निकालांने नाराज न होता, खचून न जाता खासदार श्रीमती धानोरकर यांनी जनतेच्या प्रश्नावर लोकसभेत आणि जिल्हयात आक्रमक झाल्या. महिला असली तरी आपण सक्षम असल्यांचे त्यांनी विराधकांना दाखवून दिले.