मीडिया कोणताच लहान नसतो..!
उमेदवार निवडणूक लढतात, यापैकी एकाचा विजय होतो, आणि उर्वरितचा पराभव. निवडणुकीच्या काळात प्रचारात सर्वच उमेदवारांना विजयाची खात्री असते. तशी ती बल्लारपूर मतदारसंघातही होती. लोकसभेत 45000 चा फटका बसल्याने सुधीर मुनगंटीवार यांना ही निवडणूक जड जाईल असे अनेकांना वाटले. मात्र त्यांनी केलेले विकास कामे, केवळ कार्यकर्त्यांवर विसंबून न राहता आपल्या हातात घेतलेली निवडणुकीची यंत्रणा यामुळे बल्लारपूर मतदारसंघात काँग्रेसचे संतोष रावत यांचे सोबत तुल्यबळ लढत दिसत होती. सुधीर मुनगंटीवार च्या विजयाची जनतेला जशी खात्री होती, तसा संतोष रावत समर्थकांना यावेळी चमत्कार घडेल यावर विश्वास होता. मात्र कोसंबीची घटना घडली आणि निवडणुकीचे पारडे सुधीर मुनगंटीवार यांच्या बाजूने झुकले. पत्रकारिता काय चमत्कार घडवू शकते, याचे उदाहरण म्हणजे बल्लारपूर मतदारसंघातील कोसंबीच्या घटनेचे वृत्तांकन.
एरवी पोर्टल मीडियाला तुच्छ समजणाऱ्यांना, पब्लिक पंचनामा या पोर्टल मीडियानेच निवडणुकीच्या निकालात बदल कसा घडवू शकतो याचे उदाहरण घालून दिले. कोणताही मीडिया लहान नाही हेही यानिमित्ताने स्पष्ट झाले. *एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, मोठमोठ्या राजकीय पक्षांचे स्वतःचे सोशल माध्यम सेंटर आहेत. पाचही वर्ष हे सोशल माध्यमे कार्य करीत असतात भाजपच्या सोशल मीडिया सगळ्यात मोठा मीडिया म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. परंतु कोसंबी सारखी घटना घडत असताना हा मीडिया कुठे शिकारीला गेला होता हे मात्र कळले नाही.*
18 तारखेच्या रात्रौ, साडेबारा वाजता चे दरम्यान वाय + सुरक्षा असलेले पालकमंत्रीच्या सभेत काँग्रेसच्या उमेदवाराकडून घुसून पालकमंत्री ला धक्काबुक्की केली जाते, तिथे राडा होतो, सुरक्षा रक्षकामुळे पालकमंत्री बचावतात, ही तशी मोठी घटना, मात्र प्रिंट मीडियात, मतदानाच्या दिवशी प्रकाशित झाली असती, एवढ्या रात्रौ, कोणत्याही मीडियाने याची दखल घेतली नाही. सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यक्रम झाल्याबरोबर त्यांचे मीडियाकडून निघणारी प्रेस नोट देखील त्यादिवशी निघाली नव्हती. मात्र पब्लिक पंचनामा ने ही बातमी रातोरात उचलली. घटनेचे वृत्तांकन केले, पहाटे तीन वाजताच “काँग्रेस उमेदवाराकडून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना धक्काबुक्की” झाल्याची धक्कादायक सविस्तर बातमी जिल्हाभर वायरल झाली. “आज कोणत्याही पदावर नसताना संरक्षणात असलेल्या पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर या पद्धतीने काँग्रेसचे उमेदवार धक्काबुकी करीत असेल मारहाणीकरिता जात असेल तर निवडून आल्यावर सामान्यावर हे कसे दादागिरी करतील” यावर मतदारसंघात चांगली चर्चा झाली, काँग्रेस उमेदवार संतोष रावत यांचे बद्दल मतदारात नकारात्मक भावना निर्माण झाली आणि सुधीर मुनगंटीवार यांना कोसंबी सह, मुल तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण मतदारसंघात विक्रमी मतदान झाले.
मीडिया लहान असो की मोठा, त्याचे महत्त्व त्या बातमीची तीव्रता ते कशी मांडतात, कोणत्या वेळेत मांडतात यावर समाजाची प्रतिक्रिया अवलंबून असते. पब्लिक पंचनामाने याचा अचूक वेध घेत सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयात खारीचा वाटा उचलला.