भाषण देता येत नाही मग विकास कसा करणार? मतदारात चर्चा
महाविकास आघाडीचे उमेदवार नविन आहेत, त्यांना भाषणच बरोबर देता येत नाही मग ते या क्षेत्राकरीता निधी कसा आणतील? विकास कसा करतील? अशी चर्चा मतदारात आहे. भाषण शैली संतोष रावत यांचे विजयात अडथळा ठरत आहे.
विकासाकरीता मोठ्या प्रमाणात विधीमंडळात भांडून निधी खेचून आणावा लागतो. कॉंग्रेसचे संतोष रावत हे मुरब्बी राजकारणी आहेत. त्यांना राजकारणाचा खूप अनुभव आहे, मात्र आजपर्यंत त्यांनी मॅनेज करता येण्याजोग्या लहान निवडणूका लढविल्या होत्या. त्यामुळे त्यांना भाषण देण्यांची गरज पडली नव्हती. विधानसभेच्या निवडणूकीत मात्र आपली भूमिका मतदारांना समजवून सांगावी लागते. प्रसंगी भाषणही द्यावे लागते. भाषण कलेत प्रतिस्पर्धी उमेदवार सुधीर मुनगंटीवार, डॉ. अभिलाषा गावतुरे तरबेज आहेत. मात्र महाविकास आघाडीचे उमेदवारांना भाषण देण्यांची अडचण असल्यांने, त्यांची उमेदवारी कशासाठी? निवडूण आल्यावर ते काय करणार? कसे करणार? याचा कोणताही खुलासा ते करीत नाहीत. त्यामुळे त्यांचे उमेदवारीने मतदारात संभ्रम निर्माण होत आहे.
संतोष रावत हे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांचे बोट धरून, विधानसभेची निवडणूक लढवित आहे. विजय वडेट्टीवार हे ब्रम्हपुरी विधानसभेचे प्रतिनिधीत्व करतात. तेथे विकासाची बोंब आहे. रेती आणि दारू तस्करीचा अड्डा झालेला आहे. विजय वडेट्टीवार यांचा बोट धरून राजकारण करणारे संतोष रावत हे बल्हारपूर क्षेत्रातही ब्रम्हपुरी सारखेच रेती आणि दारू तस्करी वाढविण्यासाठी काम करतील अशी भिती मतदारात आहे. ही भीती रावत यांना दूर करणे आवश्यक आहे, मात्र त्यांचेकडे भूमिका मांडण्याची शैली नसल्यांने त्यांची मोठी अडचण प्रचारात होत आहे.
संतोष रावत हे नगरसेवक, नगराध्यक्ष, बाजार समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अशा विविध पद भुषविले आहे. मात्र या पदावर राहून ते नेमके कोणते कामे केलीत, याचा कोणताही उलगडा होत नाही. फक्त पद भुषविण्यापलीकडे कार्य शुन्यच असल्यांचे मतदारांत चर्चा आहे. सुधीर मुनगंटीवार यांचे करोडो रूपयाचे विकास कामाची सवय झालेल्या मतदारांना संतोष रावत हे विकासाचा गाडा पुढे हाकतील अशी शक्यता वाटत नाही.