चंदू पाटील.. ऐ बात कुछ हजम नही हुई!
सरपंच रविंद्र चौधरी यांचा भाजपा प्रवेश आणि चंदू पाटील मारकवार यांची तडफड
चंदू पाटील मारकवार, मूल तालुक्यातील ख्यातनाम समाजसेवक आणि राजकीय नागरीक. त्यांचा आमचेशी कधी संपर्क आला नाही किंवा त्यांचेबद्दल फार माहीती नाही. मात्र काल त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील व्हिडीओ आणि तेथे उपस्थित पत्रकारांनी दिलेली माहिती पाहता, त्यांची अवस्था म्हणजे ताकाला जावून भांडे लपविणारी दिसली.
सध्या विधानसभेचे राजकारण सुरू आहे. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात नेते उड्या मारत आहेत. असाच एक पक्ष प्रवेश राजगड ग्राम पंचायतीचे सरपंच रविंद्र चौधरी यांचा झाला. त्यांनी भाजपात प्रवेश घेतला. सोबत अनेकांनी प्रवेश घेतला. एक महत्वाच्या गावातील सरपंचाचा पक्ष प्रवेश होणे ही गोष्ठ तशी मोठीच आहे. याची बातमीही तेवढीच जोरदार लागली. त्यात कॉंग्रेसला खिंडार, राजगडच्या सरपंचाचा भाजपात प्रवेश अशा बातम्यामुळे चंदू पाटील हैराण झाल्यांचे दिसले. त्यांनी पत्रकार परिषद घेवून ही बातमी धांदात खोटी असल्यांचे सांगीतले. आपण कोणत्याही पक्षाचे नाही, अविरोध गावकर्यांनी निवडूण दिल्यांचे सांगीतले. आम्ही सर्व सुशिक्षीत आहोत, असे निर्णय घेणार नाही, आम्ही सर्व निर्णय एकत्र बसून एकमताने घेतो असे सांगीतले.
चंदू पाटील यांचेबद्दल जे ऐकले होते, ते काही अंशी खरेच निघाले. चंदू पाटीलांचा संबध कॉंग्रेसशी नसेल आणि कॉंग्रेसला खिंडार पडले अशी बातमी असेल तर बातमी वाचून चंदू पाटील यांचा ऐवढा जळफळाट का झाला हे समजत नाही. ते जर कॉंग्रेसचे नसेल तर, कॉंग्रेसने तसे जाहीर करायला पाहीजे की, भाजपात गेलेले सरपंचाचा कॉंग्रेसशी संबध नाही.
चंदू पाटील यांनी सांगीतले कि, ते सर्व सुशिक्षीत आहे, मग सरपंच रविंद्र चौधरी, काही लोकांना घेवून, चंद्रपूरला पालकमंत्री यांचे कार्यालयात जातात, पक्ष प्रवेश करतात, सदस्यत्वाचा फार्मही भरतात, आणि बातमी आल्यानंतर, चंदू पाटील त्यांचा खुलासा करतात. आपण काय करतो? कुठे सही करतो? हे सरपंचाना समजत नाही काय? की ते आता चंदू पाटीलांच्या दबावात आहेत? पत्रकार परिषदेत सरपंच चौधरी यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी पक्ष प्रवेश घेतल्यांचे मान्य करतात. चंदू पाटील त्यांना कोणतेही उत्तर देवू देत नव्हते, पत्रकारासमोरच जर चंदू पाटील सरपंचावर दबाव टाकत असेल तर, गावात त्या सरपंच आणि सदस्यावर दबाव टाकत नसेल कशावरून?
एकीकडे कुणी कोणत्या पक्षात जावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असल्यांचे सांगीतले. स्वत: कॉंग्रेसच्या मेळाव्यात भाषण देवून हा पक्षप्रवेश खोटा असल्यांचे सांगीतले. मग सरपंच भाजपा प्रवेश घेत असेल तर चंदू पाटील यांचा ऐवढा आकातांडव का? खिंडार कॉंग्रेसला पडली.. बोलतात चंदू पाटील.. सरपंच भाजपात जातात.. बोलतात चंदू पाटील… पत्रकार परिषदेत पालकमंत्री यांनी आपलेवर कसा अन्याय करतात हे सांगतात.. मात्र पालकमंत्री यांचेकडे कोणता प्रस्ताव घेवून गेले काय? यावर ते बोलत नाहीत.
सरपंच चौधरी सांगतात कि, त्यांचे समाजासाठी पालकमंत्री मुनगंटीवार हे सभागृह देणार होते म्हणून गेले, तेथे पक्ष प्रवेश झाला. एखाद्या समाजाला सभागृह मिळत असेल आणि चंदू पाटील यांची मदत न घेता थेट एक आदिवासी सरपंच असे सभागृह आणले तर आपली इज्जत गावात कमी होईल, दबाव कमी होईल अशी भिती चंदू पाटील यांना होती काय? आपल्याशिवाय गावात दुसरा नेता असू नये यासाठी सतत केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून, ग्राम पंचायतीच्या माध्यमातून गावावर दबावाचे राजकारण करीत असल्यांचा खुद्द राजगड मध्येच दबक्या आवाजात बोलले जाते. सरपंच असलेले चंदू पाटील मारकवार आरक्षणामुळे सरपंच पद आदिवासीसाठी राखीव झाले तर, आदिवासी युवकांला सरपंच न बनविता, स्वत: उपसरपंच बनून गावचा कारभार केल्यांचे गावकरी सांगतात. राज्यात—देशात गाजलेले राजगड गावात एकही आदिवासी तरूण सरपंचाचे लायकीचे आपण करू शकले नाही. आता आदिवासी सरपंच गावात काम करीत असतांना, तेच तुमच्या दबावात काम करीत असल्यांचे पत्रकार परिषदेत तरी दिसत होते. सरपंचानी भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला मात्र तो तुम्हाला आवडला नाही, तुमची कमीपणा दाखविणारा वाटला म्हणूनच त्यांचेवर भाजपा सोडण्यांचा दबाव तर तुम्ही टाकत नाही ना? चंदू पाटील यांना वाटले आपण कॉंग्रेसचा प्रचार करावा, त्यांनी तो केला. सरपंच रविंद्र चौधरी यांना वाटले, भाजपात जावे ते गेले.. असे असतांना चंदू पाटील हे सरपंचावर दबाव टाकून प्रवेश चुकीचा कसे ठरवित आहेत? स्वत: सरपंच यांनी पक्ष प्रवेश केल्यांचे मान्य करीत असतांना चंदू पाटील खोटा पक्ष प्रवेश का सांगतात? राजगड वरील त्यांची पकड ढिल्ली होण्याची भिती त्यांना आहे का? या प्रश्नाचे उत्तर जनता विचारीत आहे.