कॉंग्रेसनेच दिला रावत विरोधात भाजपाला मसाला
बॅंकेत नाकारलेल्या आरक्षणाचा संतोष रावत यांना ‘मानसिक त्रास’
बल्हारपूर विधानसभा क्षेत्रातील निवडणूक आता चुरशीची होत आहेत. जाहीर सभा आणि या सभेतून आरोप—प्रत्यारोप अजून सुरू झाले नाही. मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या भरती प्रक्रियेत ‘आरक्षण’ गायब झाल्यांने, हा विषय चर्चेत आला आहे. कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी अमेरिकेत जावून कॉंग्रेस सत्तेत आल्यास, आरक्षण रद्द करू या कथीत व्यक्तव्याचा हवाला देत, विरोधकांनी कॉंग्रेस उमेदवार रावत यांना टार्गेट करीत बॅंकेच्या नौकर भरतीच्या जाहीरातीत आरक्षण नाही. वयोमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. हा मुद्दा चर्चेत आणला. दलित, मागासवर्गीय हे कॉंग्रेसचे परंपरागत मतदार आहेत. बॅंकेच्या भरतीतून आरक्षण गायब करण्यात आल्याचा आरोप झाल्यांने, कॉंग्रेस उमेदवार संतोष रावत चांगलेच अडचणीत आलेत. ‘शासनाचे शेअर ज्या बॅंकेत नसतात, त्यांना आरक्षण लागू होत नाही’ असा तांत्रिक कारण देत बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, या नौकर भरतीत आरक्षण द्यावे लागू नये याकरीता, शासनाने आपले शेअर परत मागीतले नसतानाही संतोष रावत यांनीच संचालकाच्या बैठकीत शासनाचे 12 लाख 71 हजार शेअर परत करण्याचा ठराव घेतल्यांचे आता मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजु कुकडे यांनी उघड केल्यांने, रावत यांची बनवेगीरी उघड झाली आहे. कुठलीही सहकारी बॅंक अधिका—अधिक शेअर गोळा करीत असतांना, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने स्वत:हून शासनाचे शेअर परत करण्यामागे, संतोष रावत यांची आरक्षण विरोधी भूमीकाच कारणीभूत असल्याचा आरोप कुकडे यांनी केला आहे.
राजू कुकडे यांचे आरोपाने व्यथीत झालेले संतोष रावत यांनी, विरोधक आपल्याला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप केला. मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत भ्रष्टाचार झाला आहे, या बॅंकेत घोटाळा झाला आहे असा आरोप रावत यांचे विरोधक सुधीर मुनगंटीवार किंवा भाजपाचे कुणीही केला नाही तर, खुद्द कॉंग्रेसचे तत्कालीन खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत, तर त्यावेळच्या आमदार आणि आताचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत केला होता. या संदर्भातील पुरावेही त्यांनी संबधीत मंत्रीला देवून चौकशीची मागणी केली होती. याचाच अर्थ कॉंग्रेसनेच कॉंग्रस नेत्याच्या ताब्यातील भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. या निवडणूकीत संतोष रावत आता विधानसभेत कॉंग्रेसकडून लढत असल्यांने बॅंकेतील कथीत गैरव्यवहार त्यांच्या विजयात अडसर ठरत आहे. उल्लेखनीय म्हणजे, ज्या प्रतिभा धानोरकर यांनी संतोष रावत आणि मध्यवर्ती बॅंकेवर घोटाळयाचा आरोप केले, सीबीआय चौकशीची मागणी केली, त्याच प्रतिभा धानोरकर यांचा फोटो आपल्या प्रचाराच्या बॅनरवर लावून संतोष रावत यांनी आपला प्रचार सुरू केला आहे.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे हे वरोरा—भद्रावतीचे आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर या देखिल त्याच भागातील आहे. बल्हारपूरमधून संतोष रावत यांना उमेदवारी मिळू नये याकरीता प्रतिभा धानोरकर यांनी बराच प्रयत्न केला होता. मात्र उमेदवारी मिळविण्यात रावत यांना यश आले. हे सर्व लक्षात घेता, राजु कुकडे यांनी केलेला आरोप आणि त्यांचेजवळीत पुरावे कुणी दिले हे वेगळे सांगण्याची गरज नाही.