स्पोटक वापरून ए.टी.एम लुटणारी टोळी पोलिसांच्या तावडीत..
पुणे:- संपादक शौकत मुजावर
दौंड तालुक्यातील पारगाव येथे इंडिया वन कंपनीचे ए.टी.एम मशीनची टेहाळणी करून मे-२०२३मध्ये आरोपी १)विशाल छबू पल्हारे वय-२०, रा.हंगेवडी, ता.श्रीगोंदा,जि.अहमदनगर. २)आदित्य प्रदीप रोकडे वय-२०, रा.चिंचणी,ता.शिरूर, जि.पुणे. ३)अनिकेत संजय शिंदे वय-२०,रा. बोरी,ता.श्रीगोंदा,जि.अहमदनगर. यांनी ए.टी.एम मशीन स्पोटक वापरून लुटण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्पोटकाचा वापर करता येत नसल्याने आरोपी तेथून पळून गेले,सदर घटने बाबत यवत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
स्पोटक वापरून ए.टी.एम मशीन लुटण्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या,सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना आरोपींनी दि. ६/७/२०२३ व दि. २६/७/२०२३ रोजी असा दोनवेळा प्रयत्न करून सुद्धा ए.टी.एम लुटण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला,परंतु स्पोटकाद्वारे स्पोट घडवून चोरीचा प्रकार गंभीर असल्याने गुन्ह्याची उकल करणे पोलिसांसाठी गरजेचे होते.
स्थानिक गुन्हे शाखेने सी.सी.टी.व्ही फुटेज,गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हा दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सदरची कामगिरी पो.अधीक्षक अंकित गोयल,अ.पो.अधीक्षक आनंद भोईटे बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.अविनाश शिळीमकर, स.पो.नि.राहुल गावडे,पो.स.ई. गणेश जगदाळे,पो.ह.सचिन घाडगे, तुषार पंदारे,राजू मोमीन,अतुल डेरे, जनार्दन शेळके,योगेश नागरगोजे, असिफ शेख यांनी केली असून पुढील तपास यवत पो.स्टे.चे पो.नि. विकास कापरे करत आहेत.